दुबई – आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे विजेतेपद मिळवू शकेल असा संघ म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यांनी सुरुवात ज्या पद्धतीने केली व नंतर ज्या पद्धतीने त्यांची कामगिरी खालावत आहे ते पाहता आजच्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे. हैदराबादलाही या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या सामन्यातील विजय आवश्यक आहे.
हैदराबाद विरूध्द पंजाब या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#SRH have won the toss and they will bat first against #KXIP.#Dream11IPL pic.twitter.com/sVGkKX5l1F
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2020
दरम्यान, या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघानी एकूण पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी हैदराबादला 2 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर पंजाबला 5 सामन्यापैकी एकच विजय संपादित करता आला असून 4 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या सामन्यातील विजय आवश्यक आहे.