कैरो : इजिप्तमध्ये गेल्या आठवड्यात उघडण्यात आलेल्या २५०० वर्षांच्या जुन्या थडग्यांमुळे अनेक रहस्यांचा भेद होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कैरोच्या दक्षिणपूर्व भागात अबूसीर नेक्रोपोलीस (कब्रिस्तान) मध्ये असे एक चेंबर मिळाले आहे. जेथे रॉयल लीडर खेंटकॉसला दफन करण्यात आले होते. याठिकाणीही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
खेंटकॉसच्या कबरीपासून 650 फूट दूर तिचा पती पति फिरौन नेफेरफ्रे याला दफन करण्यात आले होते. याबाबत संशोधन करणाऱ्या चेक इंस्टिट्यूट ऑफ इजिप्टॉलजीचे लीडर प्रोफेसर मीरोस्लाव बार्ता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे येथे सापडलेल्या शिलालेख आणि तांब्याच्या वस्तूंमुळे महत्वाची माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. खेटक्रोस आणि त्या काळातील इतर लोकांचा अंत कसा झाला होता, याबाबत नवी माहिती मिळण्याची आशा संशोधकांना आहे.
त्या काळात पाण्याच्या टंचाईमुळे पिके व्यवस्थित येत नसावीत. त्यामुळे शासनकर्त्यांना कराचे उत्पन्न मिळत नसावे. राज्याचा विकास होत नव्हता अशी माहिती संशोधकांना यापूर्वी मिळाली आहे. त्या माहितीला पुष्टी देण्याचे काम हि थडगी करतील, असे चेक इंस्टिट्यूट ऑफ इजिप्टॉलजीच्या संशोधकाना वाटते.