Live Cricket Score Asia Cup 2023 Super-4 India vs Sri Lanka : आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचाही हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 213 धावा केल्या. आशिया चषक 2023 मध्ये टीम इंडियाला दुसऱ्यांदा पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत आणि संपूर्ण संघ 49.1 षटकात 213 धावांवर बाद झाला.
रोहित शर्मा अर्धशतक झळकावून बाद झाला आहे. दुनिथ वेलल्गेने त्याला क्लीन बोल्ड केले. रोहितने 48 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 53 धावा केल्या. शुभमन गिल 25 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. दुनिथ वेलल्गेने त्याला क्लीन बोल्ड केले. विराट कोहली 12 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. ड्युनिथ वेलालगेच्या चेंडूवर तो दासुन शनाकाकरवी झेलबाद झाला.
रोहित शर्माने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे अर्धशतक आहे. या डावात त्याने 10 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या.
लोकेश राहुलने 39 धावांचे, इशान किशनने 33 धावांचे आणि अक्षर पटेलने 26 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच विकेट घेतल्या. तर चरित असलंकाने चार विकेट घेतल्या. शेवटची विकेट महिष तिक्षीना याने घेतली. भारताच्या सर्व 10 विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.