वायनाडमध्ये राहुल गांधींची ७ लाख मतांनी आघाडी

नवी दिल्ली -जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखणार की सत्ता परिवर्तन होणार याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्‍झिट पोल) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला दुसरा कार्यकाळ लाभणार असल्याचे भाकीत केले आहे. तर एनडीएला मोठा हादरा बसणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. यापार्श्‍वभूमीवर, देशातील जनतेचा कौल कुणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातूून समोर येईल.

वायनाडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची ७ लाख मतांनी आघाडी.

भाजपध्यक्ष अमित शहा गांधीनगरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी. 511180 मतांनी आघाडीवर.

नरेंद्र मोदी 26 मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा करणार, संध्याकाळी 6 वाजता संवाद साधणार, नरेंद्र मोदींनी 2014 ला 26 मे रोजी शपथ घेतली होती

जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव; चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.

 

उत्तर प्रदेशमधील अमेठीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पिछाडीवर, भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी ११२२६ मतांनी आघाडीवर आहेत. 

पोटनिवडणुकीत भाजपाला हादरा, दिवंगत पर्रिकर यांच्या मतदारसंघात काँग्रेसची बाजी

लोकसभा निवडणुकीतील ५४२ पैकी ५४२ मतदारसंघांचे कल हाती असून यातील एनडीए ३३९ जागांवर आघाडीवर आहे. तर यूपीए ८५ जागा आघाडीवर आहेत. तर अन्य पक्षांना ११८ जागा मिळाल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ५४२ पैकी ५४२ जागांवरील कल हाती आली असून यात भाजपा २९४ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष ११ जागांवर आघाडीवर. डीएमके २२ जागांवर आघाडीवर. तृणमूल काँग्रेस २३. शिवसेना २०.

पीडीपीला मोठा हादरा; जम्मू- काश्मीरमध्ये भाजपा आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ५४२ पैकी ५४२ जागांवरील कल हाती आली असून यात भाजपा २८८ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ५० जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष १२ जागांवर आघाडीवर. डीएमके २२ जागांवर आघाडीवर. तृणमूल काँग्रेस २५.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून २० हजार मतांनी तर अमित शाह हे गांधीनगर मतदारसंघातून ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ५४२ पैकी ५११ जागांवरील कल हाती आली असून यात भाजपा २७७ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ५२ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष १२ जागांवर आघाडीवर. डीएमके २१ जागांवर आघाडीवर

दिल्लीच्या सातही जागांवर भाजपची आघाडी.

पटनासाहिब येथे भाजप उमेदवार रविशंकर प्रसाद यांची काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर आघाडी.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ५४२ पैकी ४२७ जागांवरील कल हाती आली असून यात भाजपा २४० जागांवर आघाडीवर, काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष ११ जागांवर आघाडीवर. डीएमके १५ जागांवर आघाडीवर

पंजाबमधील गुरुदासपूर येथील जागेवर भाजप उमेदवार सनी देओल यांनी आघाडी घेतली आहे.

भाजपाची भोपाळ उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आघाडी घेतली आहे तर काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह पिछाडीवर आहेत.

उत्तर प्रदेशमधील अमेठीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पिछाडीवर, भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी आघाडीवर आहेत. 

५४२ पैकी ७१ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले असून भाजपा ४४, काँग्रेस २३ आणि अन्य पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहे. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.