नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्ता राखणार असल्याचे चित्र दिसत आहे.
नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत स्वत:चाच विक्रम मोडला असून ते 3 लाख 85 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल असून एनडीए ३५० च्या पल्याड आहे. एकट्या भाजपचे ३००हून अधिक उमेदवार आघाडीवर आहेत.