पुण्यातून गिरीश बापट विजयी

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यंदाही बाजी मारणार की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप-सेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचा कोणाला आणि किती फटका बसणार हेही तितकेच महत्वाचे  ठरणार आहेत. काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल.

पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे गिरीश बापट 215253 मतांनी विजयी, काँग्रेसचे मोहन जोशी पराभूत

शिरुरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे 542256 मतांनी विजयी. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ‭63,040‬ मतांनी पराभव

नांदेडमध्ये अशोक चव्हाण पराभूत, भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर विजयी

मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी, राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा केला पराभव

नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विजयी

बारामतीत १२ व्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांनी मिळवलं ७० हजारांच्या वर मताधिक्य

मुंबईच्या सहा जागांवर भाजप-शिवसेनेची आघाडी.

महाराष्ट्रात भाजप २४, शिवसेना ११, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ९ तर वंचित आघाडी १ जागेवर आघाडीवर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी पिछाडीवर असून धैयशील माने आघाडीवर आहेत. 

शिवसेनेचे संजय मंडलिक यांची मोठी आघाडी. तिसऱ्या फेरीअखेर 45 हजार 423 मतांची आघाडी. 

पुण्यात भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी १५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे १०५९८ मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार कांचन कुल यांना १५२७८ मते मिळवत आघाड़ी घेतली आहे.

माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे आघाडीवर  साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना 10341 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना 9168 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 719 मते मिळाली आहेत.

शिरुरमधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर

कोल्हापुरात 6747 तर हातकणंगलेत 7541 टपाली मतदान झाले आहे. टपाली मतदानात दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.