नारायणगाव -धनगरवाडी (ता. जुन्नर) येथे देशी दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकाला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 3 हजार 796 रुपयांच्या 73 बाटल्या जप्त केल्या आहेत. दशरथ रघुनाथ शेळके (वय 54, रा. धनगरवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल मच्छिंद्र लोहार दिली. गुरुवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास धनगरवाडी गावच्या हद्दीत विघ्नहर साखर कारखानाच्या टॉवरजवळ एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला दशरथ शेळके हे बेकायदेशीररित्या विनापरवाना देशी दारू जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करीत होते. सहाय्यक फौजदार केंगले, कॉन्स्टेबल सचिन कोबल, नवीन अरगडे, स्वप्निल लोहार यांनी छापा टाकला.