वैराग खून प्रकरणात 18 आरोपींना जन्मठेप

सोलापूर – निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून इजप्पा पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून निघृण खून केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने वैराग येथील 18 आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच मृताच्या पत्नीला 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.

याप्रकरणी शिवाजी पवार, सतीश पवार, सुनील पवार, शंकर पवार, राजेंद्र पवार, सागर पवार, अनिल पवार,बाबू पवार, नितीन पवार, तानाजी पवार, संतोष पवार, सागर घुले, शशिकांत घोडे, गणेश धोत्रे, सुभाष पवार, संजय दिंडोरे, विजय दिंडोरे, सचिन देवकर यांना जन्मठेप सुनावली आहे. दोघेजण फरार असून एकाच मृत्यू झाला आहे.

बार्शी तालुक्‍यातील वैराग येथे निवडणुकीच्या कारणावरून मयत इजप्पा मारुती पवार यांच्याबरोबर शशिकांत धोंडे आणि दादा काळोखे यांच्याबरोबर भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून 26 एप्रिल 2014 रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वैराग येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील सार्वजनिक रोडवर एकूण 21 जणांनी मयत इजप्पा पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने हल्ला केला होता. यात इजप्पा यांचा मृत्यू झाला होता. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील रजपूत यांनी काम पहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.