सिंधू आणि श्रीकांत मलेशिया ओपनच्या दुसऱ्या फेरीत

क्वाला लंपुर – भारतीय संघाची आघाडीची बॅदमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत येथे होत असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

यावेळी महिला गटात झालेल्या सामन्यात पी.व्ही सिंधूने अया ओहोरीचा 22-20, 21-16 असा पराभव करत आगेकूच नोंदवली. सामन्याच्या सुरूवाती पासूनच अयाने सिंधूवर आक्रमण केले. त्यामुळे सिंधू थोडी दाबावात खेळताना दिसून आली. यावेळी अयाने सिंधूसमोर स्क्वॅशच्या फटक्‍यांचा वापर करत सामन्यातील पहिल्या सेट मध्ये 5-2 ने लीड वर होती.

यावेळी सिंधूने पुनरागमनाचा प्रयत्न केला तरी अयाने तिच्यावर दबाव वाढवत ही लिड 12-7 अशा फरकावर नेली. मात्र, यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करत पहिला सेट 22-20 असा आपल्या नावे केला. तर, दुसऱ्या सेट मध्ये सिंधूने अयावर पहिल्याच सर्व्हिस पासून वर्चस्व ठेवत दुसरा सेट 21-16 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला.
तर, पुरुष एकेरीच्या सामन्यात किदंबी श्रीकांतने इंडोनेशियाच्या मौलाना मुस्तफाचा 21-18, 21-16 असा पराभव करत आगेकूच नोंदवली. तर, भारताच्या एच.एस.प्रनोयला थायलंडच्या सित्थीकोम थम्मसिनने 12-21, 21-16, 21-14 असा पराभव केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.