मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेत भूताच्या भूमिकेत झकळलेली सुंदरी म्हणजे अभिनेत्री ‘सरिता मेहेंदळे जोशी’ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले ग्लॅमर्स आणि सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.
‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेत सरिता मेहेंदळे हिने साकारलेली भूताची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, मालिकेत मोहनची भूमिका अभिनेता ‘अतुल परचुरेंनी साकारली होती.
सरिता मेहेंदळे मूळची सांगलीची परंतु अभिनयाची आवड असल्याने मुंबईत दाखल झाली. तिने रंगभूमीवर काम केलं आहे. अर्धसत्य, ए चल असं नसतं रे या नाटकात तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या.
झी मराठीवरील असे हे कन्यादान आणि कलर्स वाहिनीवरील सरस्वती मालिकेतही ती झळकली. भागो मोहन प्यारे मालिकेतून पहिल्यांदाच तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेतील एक ‘देखणी हडळ’ म्हणूनही तिला सेटवर बोलले जाते.
View this post on Instagram
16 मार्च रोजी सरिताचा वाढदिवस असतो. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले असून, साडीत सरिता मेहंदळेंचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
View this post on Instagram
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🖤❤️🖤❤️ Pc:- my fav photographer @saurabhjoca 😘😘
या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत असून, तिचं सोज्वळ सौंदर्य पाहून फॅन्स प्रेमात पडले आहे.