2019 मध्ये आलेली मनोज वाजपेयीची वेबसिरीज “द फॅमिली मॅन’चा पुढचा भाग याच महिन्यात उपलब्ध होणार आहे. ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तेव्हाच “द फॅमिली मॅन 2′ आणण्याची तयारी सुरू झाली होती.
View this post on Instagram
याच वर्षी जानेवारीमध्ये या वेबसिरीजचा टीजर रिलीज झाला होता. तेव्हापासून ही वेबसिरीज कधी रिलीज होते आहे, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. “तांडव’ ही वेबसिरीज रिलीज करण्याच्यावेळी जे वादंग झाले, त्यामुळे “द फॅमिली मॅन 2′ देखील रिलीज करणे लांबणीवर टाकले गेले. मात्र, आता या वेबसिरीजचा नवीन सीझन याच उन्हाळ्यात प्रेक्षकांना बघायला मिळेल, असे निर्मात्यांनी घोषित केले आहे. या जूनमध्ये हा नवीन सीझन ऍमेझोन प्राईमवर रिलीज होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
पहिल्या सीझनमध्ये मनोज वाजपेयीबरोबर सामंथा अक्किनेनीनेही लीड रोल केला आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर दिलेल्या शुभेच्छांमध्ये निर्मात्यांनी तसे सूतोवाच केले आहे. “द फॅमिली मॅन 2′ चा टीजर बघितल्यावर मनोज वाजपेयीचा बदललेला अंदाज लक्षात येतो. मुसा जिवंत आहे की मेला, याचा उलगडा या नव्या सीझनमध्ये होईल.