करोनाच्या साथीमुळे एकापाठोपाठ एक करत सिनेमे थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचे निर्णय होत आहेत. तर काहींची रिलीज डेट पुढे ढकलली जात आहे. तर काहींच्या शूटिंगच्या तारखांचे वेळापत्रकच नव्याने आखावे लागले आहे. फरहान अख्तरचा लीड रोल असलेल्या “तुफान’ची रिलीज डेट देखील पुढे ढकलली गेली आहे.
View this post on Instagram
या सिनेमाचा हिरो आणि निर्माता असलेल्या फरहान अख्तरने करोनाच्या साथीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे. “तुफान’चे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि गेल्या सप्टेंबरमध्ये तो रिलीज देखील होणार होता.
View this post on Instagram
मात्र गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे थिएटरमध्ये “तुफान’ रिलीज न करण्याचा निर्णय घेतला गेला. या वर्षी ओटीटीवर रिलीज करण्याचे ठरले, मात्र त्याची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आहे. आता अनिश्चित काळासाठी “तुफान’ पुढे ढकलला गेला आहे. एक्सेल एन्टरटेनमेंटने करोनाच्या साथीच्या काळात नागरिकांनी घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.