नगर, (प्रतिनिधी) – शहरातील शासकीय तंत्रनिकेतन व भवानीनगर परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. गामीण भागात बिबट्याचा हल्ला, हौदोस या गोष्टी सातत्याने घडत आहेत. परंतु आता थेट शहरी भागात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरी वस्तीत भीती निर्माण झाली आहे. वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्याने हे प्राणी मानवी वसाहतीमध्ये येत आहे.
सोमवारी सायंकाळी भवानीनगर परिसरातील काही रहिवासी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांमधील एका तरुणाला शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज) आवारात एक बिबट्या दिसला. या तरुणाने परिसरातील नागरिक व वन विभागाला ही माहिती दिली. त्यानुसार माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. भवानीनगर, ढोरवस्ती, डॉक्टर कॉलनी, बुरुडगाव रोड परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणीही घराबाहेर पडू नये, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
मागील महिन्यात केडगाव उपनगर मध्ये बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते. दहा ते पंधरा तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. ही घटना ताजी असतानाच आता नगर शहरातील भर वस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
गामीण भागात बिबट्याचा हल्ला, हौदोस या गोष्टी सातत्याने घडत आहेत. परंतु आता थेट शहरी भागात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरी वस्तीत भीती निर्माण झाली आहे. वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्याने हे प्राणी मानवी वसाहतीमध्ये येत असल्याच्या घटना सध्या घडत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. भवानीनगर, ढोरवस्ती, डॉक्टर कॉलनी, बुरुडगाव रोड परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणीही घराबाहेर पडू नये, असा इशारा वन विभागाने दिला आहे.