थिरुवनंतपुरम – केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पोलिसांनी शनिवारी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेचा माजी नेता निखिल थॉमस याला सरकारी बसमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. निखिलवर महाविद्यालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. तो कोट्टायम जिल्ह्यातील कोट्टारक्करा येथे जाणाऱ्या केएसआरटीसी (राज्य परिवहन) बसमधून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले गेले.
पोलिसांनी सांगितले की, थॉमसला अलाप्पुझा जिल्ह्यातील कायमकुलम पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे, जिथे त्याची चौकशी केली जात आहे. त्याला चौकशी पूर्ण होताच अटक करण्यात येईल. थॉमस हा कायमकुलम येथील एमएसएम कॉलेजमध्ये डाव्या संघटनेचा माजी नेता राहिला आहत. महाविद्यालयीन प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपानंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने मंगळवारी त्याला संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकले. एसएफआय ही सत्तारुढ पार्टी सीपीएमची विद्यार्थी संघटना आहे.
थॉमस यांनी जे केले ते कोणत्याही एसएफआय कार्यकर्त्याने करू नये, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. केरळ स्टुडंट्स युनियन आणि राज्यातील कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने थॉमस यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच महाविद्यालयात एमकॉमची जागा मिळवल्याचा आरोप केला होता. केएसयूने सांगितले की थॉमस बीकॉम पदवी अभ्यासक्रमात नापास झाला होता. त्यानंतर त्याने छत्तीसगडच्या कलिंगा विद्यापीठाची कागदपत्रे दाखवून एमकॉममध्ये प्रवेश घेतला.