पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
टॉप 10 न्यूज
1. केंद्र सरकार आरबीआयकडे 45 हजार कोटींची करणार मागणी
महसूल वाढवण्यासाठी सरकार घेणार महत्वपूर्ण निर्णय
2. आम्ही भविष्यातील प्रत्येक आव्हानास सामोरे जाण्यास सज्ज
लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला विश्वास
3. उत्तर प्रदेशात प्रवासी बस आणि ट्रकचा अपघातात 20 जणांचा होरपळून मृत्यू
राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रु.यांची आर्थिक मदत
4. देशात नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू
केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
5. का विरोधातील निदर्शनात रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान
कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात
6. 2018 मध्ये दर 40 व्या मिनिटाला एका बेरोजगाराची आत्महत्या
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून स्पष्ट
7. ऍसिड हल्ल्यातील पीडितेच्या वकीलास चित्रपटात श्रेय द्या
दिल्ली उच्च न्यायालयाचे छपाक चित्रपटाच्या निर्मात्यांना आदेश
8. युक्रेनचे विमान आम्ही चुकून पाडले
विमान अपघाताविषयी इराणची लष्कराची कबुली
9. तानाजी सावंत यांची पक्षातून हकापट्टी करा
शिवसैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
10. काही लोक देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी विद्यार्थांचा वापर करतायेत
जेएनयू प्रकरणावरून अनुपम खेर यांची संतप्त प्रतिक्रिया