नवी दिल्ली : देशातील सद्य परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकारी समितीची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधातील निषेध आणि जेएनयूमधील हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, अर्थव्यवस्थेतील मंदी, बेरोजगारी, आणि शेतकर्यांच्या परिस्थिती यावर चर्चा झाली.
Congress interim President Sonia Gandhi: The CAA is a discriminatory and divisive law. The sinister purpose of the law is clear to every patriotic, tolerant and secular Indian: it is to divide the Indian people on religious lines. https://t.co/5n5LcZAFyo
— ANI (@ANI) January 11, 2020
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बैठकीत म्हणाल्या की, सीएए (का) कायदा भेदभाव करणारा आणि फूट पाडणारा कायदा आहे. हा कायदा धार्मिक आधारावर विभाजन करणारा कायदा आहे.
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा, ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर अनेक नेत्यांचा समावेश आहे.
कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकार मताच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात व्यस्त आहे. सरकारला आर्थिक परिस्थितीबाबत कोणतीही चिंता नाही.