Leader of Opposition Vijay Wadettiwar’s on NCP ECI Verdict : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांआधी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, “घड्याळाचे काटे हाताने उलट्या दिशेने फिरवून सत्ताधाऱ्यांनी आज ‘वेळेला’ आव्हान दिले आहे. आगामी निवडणुकीत हीच ‘वेळ ‘ हातातील सत्ता हिसकावून सत्ताधाऱ्यांवर वाईट वेळ आणल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
घड्याळाचे काटे हाताने उलट्या दिशेने फिरवून सत्ताधाऱ्यांनी आज ‘वेळेला’ आव्हान दिले आहे. आगामी निवडणुकीत हीच ‘वेळ ‘ हातातील सत्ता हिसकावून सत्ताधाऱ्यांवर वाईट वेळ आणल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
देशात लोकशाहीची थट्टा किती सुरू आहे हे जनतेला दिसत आहे. आधी शिवसेना पक्ष फोडला आता…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
पुढे त्यांनी म्हटले आहे की, आधी शिवसेना पक्ष फोडला आता राष्ट्रवादी. देशात लोकशाहीची थट्टा किती सुरू आहे हे जनतेला दिसत आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेब हे समीकरण खोडून काढण्याचा आज प्रयत्न झाला. पण हे जास्त काळ टिकणार नाही. 2024 मधील लढा लोकशाही वाचवण्यासाठी आहे. लोकशाही संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे पण जनता हे होऊ देणार नाही.