पुणे – राज्यातील किमान आणि कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ झाली. सोमवारी अकोला येथे उच्चांकी ३५.४ अंश सेल्सियस तापमान हाेते. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात सध्या वाढ झाली आहे. मात्र आता येत्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, वाऱ्यांची प्रभावी चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे. या सर्व स्थितीचा प्रभाव राज्यातील हवामानावरही होईल. उत्तरेत थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वाढता प्रभाव तसेच राज्यातील कोरड्या हवामानामुळे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. चार दिवसांनी पुन्हा १२ फेब्रुवारीपर्यंत गारवा वाढणार असल्याचा अंदाज आहे.
निफाड, धुळ्याचा पाराही वाढला
राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. निफाड, धुळ्यासह किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या पुढे गेला असून, किमान तापमान १० ते २२ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. आजही किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
सोमवारचे तापमान
शहर कमाल किमान
नाशिक ३२.६ १६.४
अकोला ३५.४ १४.६
अमरावती ३३ १९.९
बुलडाणा ३३.४ १८.२
संभाजीनगर ३३.४ १७.7७