Ajit Pawar Gets NCP Party and Symbol : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांआधी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे.
निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 6, 2024
पुढे ते म्हणाले की, या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे ते म्हणाले.