पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सलग पाचव्या महिन्यात दरवाढ2. अरविंद केजरीवाल रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होणार रामलीला मैदानावर3. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त ट्विट
छत्रपती मोदी जिंदाबाद..म्हणत मोदींची केली शिवाजी महाराजांसोबत तुलना4. आसाममध्ये एनआरसी संबंधीचा डेटा ऑफलाईन
डेटा सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांची माहिती5. कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने आंध्र प्रदेशात शेतकऱ्याची आत्महत्या
औषधे घेवूनही सर्दी बरी न झाल्याने उचचले टोकाचे पाऊल6. आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्यावर जीवघेणा हल्ला
हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी7. चीनमध्ये कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ
आतापर्यंत 1,017 नागरिकांचा मृत्यू8. मनसेचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला विरोध
मनसेकडून कार्यक्रमाच्या केम छो मिस्टर प्रेसिडेंट या नावावर आक्षेप9. आपने केलेल्या कामावरच मते मागितली, लोकांना गंडवले नाही
आपच्या विजयावरून शिवसेनेने भाजपला सुनावले खडेबोल10. गायक अदनान सामीने साधला पाकिस्तानवर निशाणा
म्हणाला काश्मीरचा मुद्दा सोडवला तर पाक लष्कराला पैसे मिळण्याचा मार्ग होईल