सेंट लुइस (अमेरिका) : भारताची बुध्दिबळपटू द्रोणावल्ली हरिका हिला कायर्न्स कप बुध्दिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. हरिकाला वेलेंटिना गुनिना हिने ३८ चालींमध्ये पराभूत केले.
हरिकाचा स्पर्धेतला हा पहिला पराभव होता. याआधीच्या चौथ्या फेरीमध्ये अमेरिकेच्या इरिना क्रिशने हरिकाशी ४४ चालींमध्ये बरोबरी साधली होती. पुढील फेरीमध्ये हरिकासमोर विश्व विजेती ‘वेंजुन जू’ हिचे आव्हान असणार आहे.
♕ Here is the #CairnsCup leaderboard after 5 rounds ♕ pic.twitter.com/CgAAT70DQZ
— Chess.com (@chesscom) February 12, 2020
दरम्यान, पाचव्या फेरीनंतर हरिकाचे २.५ गुण असून ती गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तर, वेलेंटिना गुनिना हिचे २.० गुण असून ती आठव्या स्थानी आहे.