वॉशिंग्टन – अमेरिकेकडून गेल्या वर्षी तब्बल १ लाख ४० हजार भारतीयांना शैक्षणिक व्हिसा देण्यात आला. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील नागरिकांच्या थेट संपर्काला प्रोत्साहन देण्याचे धोरण अमेरिकेचे अधयक्ष ज्यो बायडेन यांनी अनुसरले आहे. या धोरणाअंतर्गत एवढ्या भारततीयांना हा शैक्षणिक व्हिसा देण्यात आला आहे. व्हिसा सेवांसाठीच्या एका वरिष्ठ अधिकारी महिलेने एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे.
या वर्षी भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात व्हिसा देण्यासाठी भारतातील अमेरिकेच्या दूतावासाकडून व्यापक प्रयत्न केले जात आहेत, उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक महिने आगोदरपासूनच प्रयत्न सुरू करण्यात आले होते, असेही या अधिकारी महिलेने सांगितले.
अमेरिकेत शिक्षणासाठी येत असलेल्यांमध्ये भारतीयांची संख्या अलिकडच्या काळात वाढली आहे.
व्हिसा देण्यासाठी अनेक श्रेणींना वगळण्यात आले आहे. जे पूर्वी अमेरिकेला जाऊन आले आहेत, त्यांना व्हिसाच्या मुलाखतींमधून वगळण्यात आले आहे. गेल्यावर्षी भारतातून १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा देण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही कारणासाठी अमेरिकेला जाऊ इच्छित असलेल्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहनअमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे.