श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी आज लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली, अशी महिती पोलिसांनी दिली. दनिश अहमद चन्ना से या दहशतवाद्याचे नाव असून शुक्रवरी रात्री सोपोर भागामध्ये झालेल्या कारवाईदरम्यान त्याला पकडण्यात आले.
त्याच्या जवळून एक पिस्तुल अणि एक हात बॉम्ब ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्याविरोधात दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखालील विविध कलमांखाली गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले. गुरुवारी दहशतवाद्यांच्या भूमिगत गटातील दोघा सदस्यांनाही बारामुल्ला जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.