नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 दिवसेंदिवस चंद्राच्या जवळ जाताना दिसत आहे. चांद्रयान-2 ने महत्वाचे टप्पे पार करत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. दरम्यान, या महत्वाच्या टप्प्यानंतर आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चांद्रयानापासून लॅंडर विक्रम आज वेगळा होणार आहे. आज दुपारी 12 वाजून 45 मिनीटे ते 1 वाजून 45 मिनीटापर्यंत लॅंडर वेगळा केला जाणार आहे.
#ISRO
The final and fifth Lunar bound orbit maneuver for Chandrayaan-2 spacecraft was performed successfully today (September 01, 2019) at 1821 hrs IST.For details please visit https://t.co/0gic3srJx3 pic.twitter.com/0Mlk4tbB3G
— ISRO (@isro) September 1, 2019
चांद्रयान-2 ने महत्वाचे टप्पे पार केल्यानंतर आजचा यानाचा महत्वाचा टप्पा योग्यपणे पार पाडण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, यानाने दोन महत्वाचे टप्पे पार केल्यानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी माध्यमांशी संवाद साधून चांद्रयानाच्या पुढील वाटचालीची माहिती दिली होती. 2 सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लॅंडर वेगळे होणार आहे. तसेच 3 सप्टेंबर रोजी इंजीन चालु करून लॅंडरची चाचपणी करणार आहोत यात लॅंडर व्यवस्थित चालु आहे का यात काही तांत्रिक अडचण आहे का हे पाहणार असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले होते. त्यानुसार आज चांद्रयान-2 पासून लॅंडर विक्रम वेगळा करण्यात येणार आहे.