Land For Job Case Hearing : आरजेडी सुप्रीमो लालू यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांना दिल्लीच्या न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने लालू कुटुंबीयांना लँड फॉर जॉब प्रकरणी (Land For Job Case) जामीन मंजूर केला आहे.
तिघांनाही ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
#UPDATE | Delhi’s Rouse Avenue Court grants bail to Former Bihar CM and RJD chief Lalu Yadav, former Bihar CM Rabri Devi, Bihar Deputy CM Tejashwi Yadav and RJD MP Misa Bharti, in connection with the alleged land-for-jobs scam case. https://t.co/LfiJYMY5wN
— ANI (@ANI) October 4, 2023
दरम्यान, लँड फॉर जॉब प्रकरणातील (Land For Job Case) लालू आणि राबरी यांच्यासह सहा आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज ग्राह्य मानून न्यायालयाने सर्व ६ आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लोकांना रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या बदल्यात त्यांच्या जमिनींची नोंदणी (Land For Job Case) करून घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने या वर्षी 18 मे रोजी जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात लालू, राबरी, तेजस्वी यांच्यासह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे.