Entertainment – नितेश तिवारीचा ड्रीम चित्रपट ‘रामायण’ बनवण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या चित्रपटासाठी मुख्य पात्र म्हणजेच भगवान राम आणि माता सीता यांची कास्टिंग पूर्ण झाली आहे. ओडिशा टीव्हीवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारणार आहे, तर दक्षिण अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे.
आलिया भट्ट माता सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा याआधी होती, परंतु तारखेच्या वादामुळे आलियाने चित्रपटाला नकार दिल्याची चर्चा सुरु आहे. आता निर्मात्यांनी साई पल्लवीला कास्ट केले. निर्मात्यांनी रावणासाठी अभिनेत्याची देखील निवड केली आहे आणि रिपोर्टनुसार, साऊथचा सुपरस्टार यश या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘रामायण’ दोन भागात बनणार..
‘रामायण’ दोन भागात बनवणार आहेत. पहिल्या भागात रणबीर कपूर आणि साई पल्लवीवर लक्ष केंद्रित केले जाईल, तर दुसऱ्या भागात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर साई पल्लवी 2024 च्या सुरुवातीला ‘रामायण’ पार्ट 1 चे शूटिंग सुरू करणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. यश पुढच्या वर्षी जुलैपासून त्याचे शूटिंग सुरू करणार आहे.
लोकांनी ‘रामायण’ न करण्याचा सल्ला
नुकताच ‘रामायण’ वर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला ज्यामध्ये प्रभास आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होते. मात्र, लोकांना हा चित्रपट आवडला नाही आणि तो अनेक वादात सापडला. अशात अनेकांनी नितीश तिवारी यांना ‘रामायण’ न बनवण्याचा सल्ला दिला. मात्र, चित्रपट निर्माते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.