पुणे : कर्णधार लियोनल मेस्सीने दूस-या सत्रात केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ‘ला लीगा’ फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात ग्रेनेडाचा १-० ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत पुन्हा अव्वलस्थान पटकावलं आहे.
Messi leads @FCBarcelona to victory in @QSetien's debut! 💙👑❤️#BarçaGranada 1-0 pic.twitter.com/YE5I7zrEys
— LALIGA English (@LaLigaEN) January 19, 2020
गतविजेत्या बार्सिलोना आणि रियल माद्रिद संघाचे समान ४३-४३ गुण आहेत पण गोल फरकामुळे बार्सिलोना अव्वलस्थानी पोहचले आहे. बार्सिलोना संघाचा हा नवीन प्रशिक्षक क्वीक सेटिएन यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला आणि या सत्रात २० सामन्यातील १३ वा विजय आहे.
Barça's win keeps them top of #LaLigaSantander. 🔝
The competition between @FCBarcelona and @realmadriden could not be stronger. 👊 pic.twitter.com/YOur3Ggy0k
— LALIGA English (@LaLigaEN) January 19, 2020
सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आलं होते. त्यानंतर उत्तरार्धात दोन्ही संघानी आक्रमक सुरूवात केली. मेस्सीने ७६ व्या मिनिटांला गोल करत बार्सिलोना संघास १-० ने आघाडी मिळवून दिली आणि ही आघाडी निर्णायक ठरली.