वडिलांचं छत्र गमावलेल्या मुलाचे भावुक स्पीच
तेहरान – तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान कोसळले होते. या विमानातील सर्व 176 प्रवासी आणि कर्मचारी ठार झाले होते. यानंतर युक्रेनचे विमान आपल्याकडून “चुकून’ पाडले गेले असल्याची कबुली इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने दिली. तसेच क्षेपणास्त्र डागले गेले ही मानवी चूक असल्याचे लष्कराकडून मान्य केले गेले. या संदर्भातील चिमुकल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
While so many of us struggle to find the words to express our sadness over the many lives lost in last week’s horrific plane crash, — who lost his beloved father, Mansour — shows unbelievable poise in the face of extreme tragedy. We can all learn from Ryan. pic.twitter.com/L5fePoKiKN
— Catherine McKenna (@cathmckenna) January 16, 2020
दरम्यान या व्हिडिओमध्ये अपघातात वडिलांचे छत्र गमावलेल्या एका चिमुकल्याचे भाषण सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. या व्हिडियमध्ये कॅनडातील ओटावा इथं कार्टन युनिव्हर्सिटीमध्ये विमान दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या स्मरणार्थ प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रेयान नावाच्या मुलाने त्याच्या वडिलांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
रेयान म्हणाला की, माझ्या वडिलाच्या आवाजात किंवा त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नव्हती. मला असा एकही क्षण आठवत नाही आणि आठवणारही नाही. मी वाईट गोष्टींबद्दल बोलणार नाही. मला माहिती आहे जर माझे वडील जिवंत असते आणि इतर कोणाचा दुर्घटनेत मृत्यू झाला असता तर तेसुद्धा भाषणात वाईट बोलले नसते. म्हणून मीसुद्धा नकारात्मक बोलणार नाही. त्याने या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर रेयानने सर्व लोकांचे आभार मानले. त्याच्या भाषणावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.