मुंबई – मुंबईसह (mumbai) देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या (Lalbaug cha Raja) दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात.
लालबागच्या राज्याच्या (Lalbaug cha Raja) दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचा सहावा दिवस असल्याने आजही राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी आहे.
तर राज्याच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांना तासन् तास राज्याच्या दर्शनासाठी प्रतिक्षेत आहे. गर्दीमुळे भक्तांची लालबागच्या (Lalbaug cha Raja) सभामंडपात मोठी गैरसोयदेखील होत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अश्यातच काल राजाच्या दरबारातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्या व्हिडिओची दखल घेतली आहे.
या व्हिडिओमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला चक्कर आल्याचं दिसून येत आहे. तास न् तास रांगेत उभं राहिल्यामुळे या तरुणीला चक्कर आल्याने ती कोसळली. त्यामुळे इतर भाविकांनी लगेच धावून जात तिची मदत केली.
तिचे पाय दुखत होते. अचानक तिला घाम फुटला, डोळ्यासमोर गरगरायला लागलं. चक्कर आली. यावेळी आसपासच्या भाविकांनी तिला सावरलं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
या घटनेवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, “माझ्या कानावर ही बाब पडली. काही भगिनींना तिथं भोवळ आली, त्यानंतर तशी परिस्थिती झाली. लालबागचा राजा देश पातळीवर प्रसिद्ध झालाय, अशातच व्हीआयपी जातात.
त्यामुळं सामान्यांना ही तिथं जावंस वाटतं. लालबागचा राजा हा जागरूक गणपती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं तिथं दर्शनाला मोठी गर्दी होते. व्हीआयपीसाठी वेगळी आणि सामान्यांसाठी वेगळी रांग केलेली आहे.
तरी ही अशी परिस्थिती उद्भवली, तर गणेश मंडळांची जबाबदारी असते, अन सरकार म्हणून आमचे पोलीस त्यांना सहकार्य करतील’ असं अजित पवार म्हणाले.