लोणी धामणी -दिवाळी सुरू झाली आहे. मात्र दोन दिवसानवर आलेल्या लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी सध्या आंबेगाव तालुक्यातील छोट्या मोठ्या
गावांमध्ये लगबग सुरू झाली आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुणी (लक्ष्मी) बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे.
अवसरी बुद्रुक, निरगुडसूर, लाखणगाव, लोणी, धामणी परिसरात मोठ्या प्रमाणात सिंधाडाच्या झाडापासून तयार केलेली केरसुणी (लक्ष्मी) पूजनासाठी दाखल झाली आहे.
गेल्या वर्षी करोनाच्या महामारीमळे आम्हा व्यावसायीकांना चांगलाच फटका बसला होता, असे लोणी येथील भरत पंचरास यांनी सांगितले.
लक्ष्मीपूजनाला केरसुणीची (लक्ष्मी) पूजा केली जाते. आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केरसुणीला (लक्ष्मी) मोठी मागणी असते, असे सुभाष पंचरास यांनी सांगितले.