Navneet Rana on Lok Sabha| अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यंदाची लोकसभा निवडणुक त्या भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार असल्याचे म्हंटले जात आहे. यातच आता नवनीत राणा यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेले विधान चर्चेत आले आहे. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये, असे सूचक विधान नवनीत राणा यांनी केले आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा ? Navneet Rana on Lok Sabha|
“आम्ही एनडीएमध्ये आहोत. आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील. आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझ्या पाठीमागे राहतील. जो काही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा घेतील, त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही. भाजप प्रवेशाबाबत योग्य वेळी योग्य निर्णय कळवू,” असंही नवनीत राणा यांनी म्हटलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपने दुसरी यादी जाहीर करत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. मात्र अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होत आहे. Navneet Rana on Lok Sabha|
नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. भाजप सोबत झालेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांनपूर्वी नमो युवा संमेलन 4 मार्चला नागपुरात पार पडला त्यावेळी एनडीएचे घटक म्हणून नवनीत राणा यांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा:
“लोकशाहीतील सर्वात मोठा…” निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया