गंगाखेड (जि. परभणी) – तालुक्यातील आदर्शगाव खादगावात उप आरोग्य केंद्र असतानाही नागरिकांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून उप केंद्रात आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांनी निवदेनात म्हंटले आहे की, खादगाव येथिल आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. रुग्णांना व ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्येसाठी रात्री अपरात्री इतर ठिकाणी जावे लागते. रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे उपकेंद्रात दोन तज्ञ निवासी डाॅक्टर, दोन परिचारिका, एक प्रोयगशाळा तंत्रज्ञ, औषध वितरक, आरोग्य सेवक, सफाई कामगार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच सुविधा न मिळाल्यास आरोग्य विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
36 ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. दरम्यान, खादगावला आदर्श गाव पुरस्कार मिळालेला आहे. मात्र आदर्शगावातच नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.