नवी दिल्ली- मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले खादीचे फेस मास्क आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. खादी मास्कसाठी http://www.kviconline.gov.in/khadimask.इथे आपली मागणी नोंदवता येणार आहे.
केव्हीआयसी सुती आणि रेशमी अशा दोन्ही प्रकारच्या मास्कची विक्री करत आहे. एका सुती फेस मास्कची किंमत 30 रुपये तर रेशमी मास्क 100 रुपये प्रती मास्क या दराने उपलब्ध आहे. ऑनलाईन खरेदीसाठी किमान 500 रुपयांची ऑर्डर नोंदवावी लागणार असून काळे काठ असलेले पांढऱ्या रंगाचे मास्क, तिरंगी काठाचे पांढरे मास्क, एकच रंग असलेले रेशमी मास्क आणि विविध रंगी प्रिंटेड रेशमी मास्क असे ग्राहकाला चार प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. खरेदीच्या दिवसापासून पाच दिवसात केव्हीआयसी मास्क पोहोचते करणार आहे. ऑनलाईन विक्री सध्या फक्त देशातच सुरू आहे.
खादी सुती फेस मास्क 100 टक्के सुती कापडाचे असून तीन चुण्या असलेले दुपदरी आहेत. छोट्या, मध्यम आणि मोठ्या अशा तीन आकारात हे मास्क उपलब्ध आहेत.?