नवी दिल्ली – इंडियन रेड क्रॉस सोसायटी खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाकडून खादीचे 1 लाख 80 हजार मास्क घेणार आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी आरोग्य क्षेत्रात काम करीत असल्यामुळे हे सर्व मास्क सुरक्षित आणि दर्जेदार असतील याची काळजी घेण्यात आली असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 20 हजार मीटर कापड लागणार असून 9 हजार दिवसांचा अतिरिक्त रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाने आतापर्यंत 10 लाख मास्क विकले आहेत.