मुंबई – दक्षिणेतील दोन मोठे स्टार्स सामंथा रुथ प्रभू आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे सध्या काश्मीरमध्ये त्यांच्या आगामी ‘कुशी’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. यातच शूटिंगदरम्यान दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले व प्राथमिक उपचार करण्यात आले.
View this post on Instagram
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या चित्रपटातील अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान दोघांनाही गंभीर दुखापत झाली, त्यामुळे काही तास शूटिंग थांबवावं लागलं.
विजय देवरकोंडा यांच्या टीमच्या प्रवक्त्याने मीडियाला सांगितले की, “समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा काश्मीरमधील पहलगाम भागात एका स्टंट सीनचे शूटिंग करत होते, त्यादरम्यान त्यांना दुखापत झाली. दृश्य खूप अवघड होते. दोन्ही कलाकार लिडर नदीवरील दोरीने बांधलेल्या पुलावरून वाहन चालवायचे होते, परंतु दुर्दैवाने, वाहन खोल पाण्यात पडले आणि दोघांच्या पाठीला दुखापत झाली.”
चित्रपटाच्या क्रू मेंबर सांगितले की, “दोन्ही कलाकारांना ताबडतोब दल सरोवराच्या काठावरील हॉटेलमध्ये नेण्यात आले. फिजिओथेरपिस्टला बोलावण्यात आले त्यांच्यावर उपचार करण्यात आले” ही घटना विकेंडला घडली होती. मात्र, रविवारी पुन्हा समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा या दोघांनीही शूटिंग सुरू केलं. पण यावेळी शूटिंग श्रीनगरच्या डल लेकमध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे.