कुमारस्वामी आता काळजीवाहू मुख्यमंत्री

बंगळूर -कर्नाटक विधानसभेतील शक्तिपरीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर एच.डी.कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सादर केला. राज्यपालांनी तो स्वीकारत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्य करण्याची सूचना कुमारस्वामी यांना केली.

राजीनामा सादर करण्यासाठी कुमारस्वामी राजभवनात गेले त्यावेळी त्यांच्या समवेत मावळत्या मंत्रिमंडळातील त्यांचे ज्येष्ठ सहकारी होते. आघाडी सरकारच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबद्दल कुमारस्वामी यांनी राज्यपालांचे आभार मानले.

त्याआधी विधानसभेत बोलताना कुमारस्वामी यांनी आनंदाने पदाचा त्याग करण्यास तयार असल्याचे म्हटले. शक्तिपरीक्षेचा फैसला लांबवण्याचा इरादा नसल्याचे सांगत त्यांनी विधानसभा सभापती आणि राज्यातील जनतेची माफीही मागितली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)