ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य आदर्शवत : किशोर शिंदे

सातारा – ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य समाजासाठी आदर्शवत असून पालिकेच्या माध्यमातून संघाला सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही नूतन उपगनराध्यक्ष किशोर शिंदे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक संघ, सातारा यांची मासिक सभा नुकतीच सुधीर धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आयोजित सत्कार समारंभात नूतन उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व सातारा जिल्हा वारकरी संघटनेचे अध्यक्ष बबनराव सापते महाराज यांची महाराष्ट्र राज्य वारकरी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते. त्याचबरोबर यावेळी जुलै महिन्यातील संघाचे सभासदांचे वाढदिवस होते त्याचे वाचन श्रीमती आशा बोडस यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुधीर धुमाळ म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सातारा ते वडजल, ता. फलटण येथे दवाखाना वारी दरवर्षी जाते. त्याचे नियोजन वारीप्रमुख पांडुरंग खटावकर, डॉ. नंदलाल कुलकर्णी व दवाखाना सचिव सूर्यकांत जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे सातारा शहरातील औषध दुकानदार, डॉक्‍टर्स, सभासद व वारीसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्यांचे संघाच्यावतीने आभार मानले.

चार्तुमासानिमित्त ह.भ.प. बबनराव सापते महाराज यांचे श्री भगवद्‌गीतेमधील अध्यायावर भक्तीयोग या विषयावर सविस्तर प्रवचन झाले. पुढे बोलताना सापते महाराज म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाने साकाल, निराकार आणि विश्‍वरूपाचे सर्व प्रकारच्या भक्तांचे व योगीजनांच्या दोन वर्गीकरणाबद्दल विवेचन केले. साकारवादी फक्त संपूर्ण शक्तीने भगवत सेवा करतो.

परम सत्याच्या साक्षात्कारासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योग पद्धतीमध्ये भक्तीयोग हा सर्वश्रेष्ठ आहे. परमसत्य म्हणजे अध्यात्मिक पूर्णत्व आहे. जे प्रत्यक्षपणे भगवंताची उपासना करीत नाहीत, पण इतर अप्रत्यक्षपणे उद्दिष्टांच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करतात त्यांनासुद्धा भगवंताची प्राप्ती होते. पंचमहाभूतांनी देह बनला आहे पण मन सापडत नाही व अहंकारही जात नाही. प्रवचनाच्या शेवटी पसायदान होऊन सांगता करण्यात आली.

संघाचे कार्याध्यक्ष वाय. के. कुलकर्णी व सहसचिव मधुकर बाजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपाध्यक्षा सौ. विद्या आगाशे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास सुरेश कुलकर्णी, मदनलाल देवी, वैदेही देव, प्रा.अविनाश लेवे, ठाकोरभाई शहा, लोमटे साहेब, विजयकुमार रणदिवे, सौ. निलिमा देशपांडे, श्रीमती निर्मला कुमार, रमेश लोहार, सौ. निता चावरे, महिला सभासद व मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)