पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर (कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉ च्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात भारताच्या साहेब सोधी याने तर, मुलींच्या गटात रुमा गायकैवारी यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात भारताच्या साहेब सोधी याने थायलंडच्या तिसऱ्या मानांकित व नुकत्याच पार पडलेल्या आयटीएफ ग्रेड 3कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या तानापत निरूद्रोणचा 6-2, 2-6, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
भारताच्या सहाव्या मानांकित चिराग दुहानने कझाकस्तान च्या आरतूर खेरडीनव्होचा टायब्रेकमध्ये 7-6 (6), 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. भारताच्या आठव्या मानांकित युवान नांदलने मानव जैनचा 4-6, 7-5, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. अनर्घ गांगुलीने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या जैष्णव शिंदेचा टायब्रेकमध्ये 7-6 (5), 6-0 असा पराभव केला.
मुलींच्या गटात पहिल्या फेरीत कशिश बोटेने परी चव्हाणला 6-4, 3-6, 6-4 असे तीन सेटमध्ये पराभूत केले. पुण्याच्या रुमा गायकैवारीने कोतिष्ठा मोडकचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. कोल्हापूरच्या सोनल पाटील हिने लक्ष्मी गौडाला 7-5, 6-0 असे नमवले.
संक्षिप्त निकाल :
पहिली फेरी : मुले : युवान नांदल वि. वि. मानव जैन 4-6, 7-5, 6-3; चिराग दुहान वि. वि. आरतूर खेरडीनव्हो 7-6(6), 6-1; इस्लाम ओरिनबासर वि. वि. आर्यन शाह 2-6, 6-3,6-4; रुशील खोसला वि. वि. स्कंध प्रसन्न राव 6-2, 6-1; डॅनिल फेल्कर वि. वि. मुनी अनंत मणी 6-2, 6-4; मॅक्स बा ट्युटेन्को वि. वि. रेथिन प्रणव सेंथिल कुमार 6-3, 6-4; डेनिम यादव वि. वि. दक्ष अगरवाल 7-6(7), 6-1; अनर्घ गांगुली वि. वि. जैष्णव शिंदे 7-6(5), 6-0; साहेब सोधी वि. वि. तानापत निरूद्रोण 6-2, 2-6, 7-5;
पहिली फेरी : मुली : हयु किनोशितावि. वि. रिया उबवेजा 6-2, 6-2; कशिश बोटे वि. वि. परी चव्हाण 6-4, 3-6, 6-4; रुमा गायकैवारी वि. वि. कोतिष्ठा मोडक 6-2, 6-2; क्रिस्ती बोरो वि. वि. चहाना बुधभट्टी 6-1, 6-7(5), 6-0; होनोका उमेदा वि. वि. अन्या जेकब 1-6, 6-2, 6-2; श्रुती अहलावत वि. वि. नेमा सारा किस्पोटा 6-1, 6-1; सोनल पाटील वि. वि. लक्ष्मी गौडा 7-5, 6-0; सारा साईतो वि. वि. नंदिनी दीक्षित 6-2, 6-1; सुहिता मारुरी वि. वि. प्रियांशी पाणिग्राही 6-0,6-0; यू-युन ली वि. वि. आर्नी रेड्डी येल्लू 6-1, 6-1; एरकझेन एरीस्टेंबिकोव्हा वि. वि. भूमी शेखर 6-0, 6-0.