पुणे – लायन्स क्लब पुणे इंटरनॅशनलतर्फे आयोजित पॅशनेट लायन्स करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत चंद्रशेखर पाटील याच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर जाधव नाईट रायडर्स संघाने नायर इगल्स् संघाचा 5 गडी राखून पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.
मुळशी येथील मुळशी क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना नायर इगल्स् संघाने 19.4 षटकांमध्ये 142 धावा केल्या. हे आव्हान जाधव नाईट रायडर्स संघाने 19 षटकांत व 5 गडी गमावून पूर्ण केले व स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स् क्लब डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चे प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅबिनेट सचिव नितीन शहा, पुणे लाईफ लाईनचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, समिती सदस्य संतोष पटवा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चे जिल्हा क्रीडा अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले. स्पर्धेचे सामने हे साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार असून, स्पर्धेत एकूण 20 सामने होणार आहेत.
संक्षिप्त धावफलक –
गटसाखळी फेरी : नायर इगल्स : 19.4 षटकांत सर्वबाद 142 धावा. (धीरज कदम 36, अभिषेक मोहिते 20, आनंद पाटील 17, नीलेश दगडे 14, चंद्रशेखर पाटील 3-28, मनोहर पाटील 2-23) पराभूत वि. जाधव नाईट रायडर्स : 19 षटकांत 5 बाद 143 धावा. (चंद्रशेखर पाटील 79, श्रीनिवास सरवदे 15, किरण भोसले 2-15). सामनावीर : चंद्रशेखर पाटील.