दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लवकरच ‘सिंघम अगेन’ (Singham Again) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. यातच आता या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची दमदार एंट्री झाली आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यातील त्याच्या धमाकेदार लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाच्या लूकचा फोटो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता निर्मात्यांनी आणखी एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. यात या फोटोमध्ये वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत सुपरस्टार अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सुपरस्टार अजय देवगणने कमेंट करत लिहिले की, ‘नको म्हणालो होतो तरीही हेलिकॉप्टरने आला माझा मित्र सूर्यवंशी.’
Mana kiya tha phir bhi helicopter se hi aaya mera dost Sooryavanshi 😁#SinghamAgain @akshaykumar @ADFFilms @RSPicturez @jiostudios @RelianceEnt #Cinergy pic.twitter.com/W8Uup37b5Q
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 5, 2023
या फोटोनंतर अक्षय कुमारनेही हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, ‘आला रे आला… सूर्यवंशी आला. एटीसी प्रमुख वीर सूर्यवंशी यांच्या प्रवेशाची वेळ झाली आहे. मग तुम्ही तयार आहात का?’ असा प्रश्न अक्षयने चाहत्यांना केला आहे.
दरम्यान, रोहित शेट्टीचे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या वर्षी 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत.