पिंपरी – भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी रागाच्या भरात स्थायी समिती सदस्याचा राजीनामा दिला आहे. तो अद्याप मी मंजूर केलेला नाही, असे महापौर माई ढोरे यांनी स्पष्ट केले.
त्यावरून भाजपचे पदाधिकारी लांडगे यांची समजूत काढून राजीनामा मागे घेण्यात यशस्वी होतील, असा संदेश महापौरांनी दिला आहे.
महापौर म्हणाल्या की, प्रत्येक जण स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक असतो. रवी लांडगे हे ही इच्छुक होते. त्यांना अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांनी रागाच्या भरात समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला. तो अद्याप मी मंजूर केलेला नाही. त्यांच्या व्यक्तिरिक्त आणखी कोणी राजीनामा दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.