छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिका “कौन बनेगा करोडपती’चा 13वा सिजन सध्या सुरू आहे. येत्या शुक्रवारी होणारा एपिसोड हा ग्लॅमरस असणार असून यात गेस्ट म्हणून बॉलीवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्री कृती सेनन आणि राजकुमार राव उपस्थित राहणार आहेत.
मनोरंजन विश्वात आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या प्रतिभावान कलाकारांनी काही वर्षातच आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. येत्या शुक्रवारी कृती सेनन आणि राजकुमार राव हे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत गेम खेळत या शोमध्ये रंगत आणणार आहे.
या शोमध्ये अनेक अनमोल क्षण चाहत्यांना अनुभवण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे कृती सेनन ही गुडघे टेकून चक्क अमिताभ बच्चन यांना प्रपोज करताना दिसणार आहे.
ज्यानंतर एक हृदयस्पर्शी बॉलरूम डॉन्सिंग क्षण पाहावयास मिळणार आहे. तसेच राजकुमार रावदेखील शाहरुख खान आणि सनी देओल यासारख्या कलाकारांची नकल करताना दिसणार आहे. या शोला आणखी मनोरंजनाचा तडका देत राजकुमार राव हा अमिताभ बच्चन यांना त्यांच्या “दीवार’मधील एक सीन करण्यास सांगतो.