राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने अलीकडेच आपल्या “बधाई दो’चे शूटिंग पूर्ण केले आहे. या जोडीचा हा पहिलाच एकत्र सिनेमा असणार आहे. यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री किती भारी असेल याची चर्चा शूटिंग सुरू असतानाच सुरू झाली होती.
आता ही जोडी अनुभव सिन्हाच्या “भीड’मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. टी-सिरीजने आपल्या ट्विटर हॅन्डलवर ही बातमी सांगितली आहे. एक अभूतपूर्व सोशल ड्रामा बनवला जाणे गरजेचे आहे.
म्हणूनच आम्ही सतत बहुमुखी होत असतो. आता “भीड’मध्ये भूमी पेडणेकरदेखील सहभागी होणार आहे. राजकुमार राव हा या सिनेमात पहिल्यापासून आहेच, असे टी-सिरीजच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“भीड’चे सगळे शूटिंग लखनौमध्ये केले जाणार आहे. या नोव्हेंबरमध्ये हा सिनेमा फ्लोअरवर येण्याची शक्यता आहे. आणखीन काही आठवडे या सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू राहणार आहे.
भूमी आणि राजकुमार राव यांचा “बधाई दो’ हा आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, सान्या मल्होत्राच्या “बधाई हो’चा सिक्वेल असणार आहे. अर्थात या सिक्वेलमध्ये पहिल्या भागाचा काही संबंध असणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.