बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुचर्चित “सूर्यवंशी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातील पहिले गाणे “आईला रे आईला’ हे काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. हे गाणे चाहत्यांनाही खूपच आवडले आहे. आता “सूर्यवंशी’मधील दुसरे गाणे “मेरे यारा’देखील रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही जोडी रोमांटिक अंदाजात दिसून येत आहे. हे गाणे सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे.
या रोमांटिक गाण्याला नीती मोहन आणि अरिजीत सिंह यांनी आपल्या गोड आवाजात गायले आहे. या गाण्याचे लिरिक्स रश्मी विरागने लिहिले असून कौशिक-गुड्डू-आकाश यांनी म्युझिक कंपोज केले आहे. हे गाणे टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अक्षय कुमारच्या आगामी “सूर्यवंशी’चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. यात त्याच्यासोबत कतरिना कैफने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय तो रणवीर सिंहसह “सिंबा’ आणि अजय देवगणच्या “सिंघम’ सीरिजमध्ये झळकणार आहे.