बॉलीवूडमध्ये सध्या अनेक चित्रपटांचा सीक्वल तयार करण्यात येत आहे. आता 2001मध्ये प्रदर्शित झालेल्या “रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटातून अभिनेता आर. माधवन आणि अभिनेत्री दिया मिर्झाने चाहत्यांची वाह-वाह मिळविली होती.
या चित्रपटाचा रिमेक करण्यासाठी निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी हे काही काळापासून प्लानिंग करत आहे. या चित्रपटात कृति सेनन आणि विक्की कौशल यांची जोडी झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवि उदयावर हे करणार आहे. यापूर्वी रविने श्रीदेवी स्टारर “मॉम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. या सिक्वलमध्ये दिया आणि माधवन हे कॅमियो रोलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची कथा आणि कलाकाराबाबत अद्याप कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
“रहना है तेरे दिल में’च्या सीक्वलसाठी निर्मात्यांना एक फ्रेश जोडी हवी आहे. यासाठी कृति आणि विक्की यांना अप्रोच करण्यात आले आहे. “रहना है तेरे दिल में’ या रोमांटिक चित्रपटात माधवन आणि दीयासह सैफ अली खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात लव ट्राएंगल दाखविण्यात आला होता.