अभिनेत्री कृति सेनन ही डायरेक्टर आशुतोष गोवारिकर यांच्या “पानीपत’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात कृति सेनन पेशवा सदाशिव राव यांच्या पत्नी पार्वती बाईची भूमिका साकारत आहे.
कृति सेननने आपल्या आगामी “मीमी’ चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलची सुरुवात राजस्थानमध्ये केली आहे. या चित्रपटाच्या सेटवर कृति पंजाबी गाण्यावर इंजॉय करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत टी-शर्ट आणि लोअरमध्ये कृति सेनन दिसते. तसेच ती खुर्चीवर निवांत ब्लॅक कॉफी घेत आहे. तर बॅकग्राउंडमध्ये पंजाबी गाणे सुरू असल्याचे ऐकू येते. त्यातच हेयर आर्टिस्ट तिची केशरचना करताना दिसतो.
“मीमी’ चित्रपटात कृति सेनन महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तिच्या भूमिकेवरच आधारित आहे. “लुकाछिपी’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून कृतिसोबत पंकज त्रिपाठी झळकणार आहे.