बॉलीवूड अभिनेत्री कृति सेनन बॅक टू बॅक अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात “आदिपुरुष’ चित्रपट सर्वाधिक चर्चेत आहे. यात तिच्यासोबत साउथ सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
यानंतर कृति सेननला आणखी एका टॉलिवूड चित्रपटाची ऑफर आली आहे. या चित्रपटातून ती दीर्घ काळानंतर तेलुगु चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे.
View this post on Instagram
कृतिने महेश बाबू स्टारर “नेनोक्काडाइन’ चित्रपटातून तेलुगु इंडस्ट्रीत डेब्यू केले होते. याशिवाय ती नागा चैतन्यसह एका चित्रपटात झळकली होती.
View this post on Instagram
यानंतर कृतिने आपला मोर्चा बॉलीवूडकडे वळवित मोठे यश संपादन केले. तिच्या “हिरोपंती’पासून “लुका-छिपी’पर्यंत अनेक चित्रपटांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कृति सेनन लवकरच अक्षयकुमारसोबत “बच्चन पांडे’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय टायगर श्रॉफ स्टारर “गणपत’मध्येही ती काम करत आहे. तसेच “मिमी’, “हम दो हमारे दो’ आणि “भेडिया’ चित्रपटही तिने साइन केले आहेत.