कोपरगाव तालुक्यात वादळी पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान; जीवित हानी नाही

कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून जोराचा वारा आणि पावसाच्या सरी सुरु झाल्याने या वादळी पावसात शेतकऱ्यांच्या पिकासह गरे,जनावरे,विजे खांब यासह लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहीती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्टयामुळे बुधवारी तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व जोराचा वारा सुरु होता मात्र सायंकाळी अति जोराचा वारा व पाऊस पडल्याने या वादळात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह साठवलेले कांदे, अंदाजे ५ हेक्टर पिके, देर्डे को-हाळे येथील शेतकरी आशुतोष संतोष आभाळे यांचे दोन एक्कर पॉलिहाऊसचे ५० लाखाचे नुकसान झाले आहे.

माहेगाव देशमुख येथील शिवाजी किसन काळे यांच्या १० गुंठे शेतीतील पॉलिहाऊसचे नुकसान झाले.
विजवितरण विभागाचे तालुक्यात तब्बल २७ विजेचे खांब,२ डिपीचे साचे, २डिपी, ७०विद्युत वाहक तारांचे गाळे या वादळी वाऱ्याने खाली कोसळल्याने ग्रामीण भागातीत विजवितरण कंपनीचे सरासरी ५लाखापेक्षा ज्यास्त मालमत्तेचे नुकसान झाले तर कोपरगाव शहर परिसरात ३उच्च दाबाच्या वाहीणीचे खांब व १५ लघु दाब वाहीणीचे खांब कोसळले. ६ ठिकाणचे डिपीचे साचे कोसळले तर २४ ठिकाणी तारा तुटल्या आहेत.

ग्रामीण भागात ८० तर शहरी भागात १९ ठिकाणी वृक्ष उनमळुन पडले यात काहींच्या घराचे नुकसान झाले आहे. जेऊर कुंभारी,बक्तरपूर, घारी,जवळके,बहादरपूर,काकडी,कान्हेगाव हिंगणी,या गावामधील काही नागरीकांची कच्ची व पक्की घरे पडली आहेत. तर चासनळी,देर्डे को-हाळे,माहेगाव देशमुख येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

अंशतः कच्ची व पक्की असे २० घरांची पडजड व पत्रे उडाले तर शहरातील गावठामधिल व उपनगरातील काही घरांची पडझड होवून पत्रे उडाले आहेत.वादळ्यामुळे मोठे नुकसान होवू नये म्हणुन प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याने जीवीत हानी व मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली नाही. बुधवारी वादळाने झालेल्या नुकसाणीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने सुरू होते.


वादळी वाऱ्या पावसाने बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलची धुर फेकणारी चिमणी कोसळली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारखान्याचे शेड, साठवलेला कोळसा व नव्याने बांधलेल्या चिमणीसह दोन कोटी ६० लाठाचे आर्थीक नुकसान झालेआहे. या घटनेचा अधिक तपास व शासकीय पंचनामा करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.