सविंदणे ( वार्ताहर): काही दिवसांपुर्वी कवठे येमाई ता. शिरूर येथे मुंबईवरून आलेले चार रुग्ण कोरोनाबाधित सापडले होते. त्यापैकी तीन रुग्ण निगेटीव्ह झाले आहे. प्रतिबंधीत चौदा दिवसाचा कालावधी नुकताच पुर्ण झाल्यानंतर कवठे येमाई येथिल ससुन रुग्णालयात काम करणारी महीला पॉझिटीव्ह असल्याची माहीती कवठे आरोग्य केंद्राचे आरोग्य आधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी यांनी दिली आहे.
ही महीला कवठे येमाई , सविंदणे येथिल अनेक जनांच्या संपर्कात आल्याने नागरीकांमध्ये मोठी घबराहट पसरली आहे. घटनास्थळी तलाठी सर्फराज देशमुख, सरपंच अरूण मुंजाळ, सरपंच संतोष मिंडे यांनी भेट दिली असून सपंर्कात आलेल्या व्यक्तिंचा शोध सूरू केला आहे.
त्यामुळे कवठे यमाई , सविंदणे परिसरातील नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश कटटीमणी यांनी दिली आहे.