आबूधाबी – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सातत्याने सलामीचे सामने गमावणाऱ्या मुंबई संघाला आजचा सामना प्रतिष्ठा जपण्यासाठी जिंकावाच लागणार आहे.
सामन्यास काही वेळातच सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाइट रायडर्सचा बाजूने लागला आहे. कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक (टाॅस) जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
The @KKRiders have won the toss and will field first against #MumbaiIndians #Dream11IPL #KKRvMI pic.twitter.com/WRmL5EM9SH
— IndianPremierLeague (@IPL) September 23, 2020
दरम्यान, या मैदानावरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला जास्त मदत करते हा इतिहास असल्याने मुंबईसमोर कोलकात्याच्या सुनील नरेनच्या गोलंदाजीचे दडपण राहणार आहे. कोलकात्याच्या मानाने मुंबईकडे सशक्त फिरकी गोलंदाजी नाही त्यामुळे कोलकात्याच्या फलंदाजांना आजचा सामना हा सोपा पेपर ठरेल हीच शक्यता जास्त आहे.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स अंतिम संघ पुढीलप्रमाणे :-
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कीरेन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
कोलकाता नाइटराइडर्स : सुनील नरेन, शुभमन गिल, नितीश राणा, इयोन मोर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), निखिल नाइक, पैट कमिंस, कुलदीप यादव, संदीप वारियर, शिवम मावी.